संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथील तांबकडा व खांबा येथील पाझर तलाव या दोन्ही तलावांचे रूपांतर साठवण तला वात करण्यात येणार आहे त्यासाठी खा सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने प्रत्येकी सात याप्रमाणे १४कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना प्रणित किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ राहाणे यांनी दिली
संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथील तांबकडा आणि खांबा येथील पाझर तलाव या दोन्ही तलाव गावाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे या दोन्ही तलावांचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी चंदनापुरी येथील ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे श्याम राहणे किसन सरोदे बाळासाहेब सरोदे, विलास सरोदे रामचंद्र सरोदे ग्राम पंचायत सदस्य तृप्ती बो-हाडे यांच्यासह ग्रामस्थांनी व खांबा येथील ग्रामस्थांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे केली होती त्यांनी या गंभीर बाबीचा विचार करून हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला त्यानंतर राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या वतीने या दोन्ही तलावासाठी प्रत्येकी सात कोटी याप्रमाणे 14 कोटी रुपये खा सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहे