10.3 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

विवेकभैय्या कोल्हे यांच्या दणक्याने आमदार काळे यांना आली जाग – विक्रम पाचोरे

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा ):-नुकतीच कोपरगाव तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचे प्रलंबित प्रश्न रखडले असल्याने तीव्र असंतोष नागरिकांनी व्यक्त केला होता.यावेळी आक्रमक भूमिका घेऊन नागरिकांचे प्रश्न कोल्हे कारखान्याने अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी मांडल्याने अखेरीस आमदारांना सहा महिने कानाडोळा केलेल्या बैठीकाला हजर राहणे भाग पडले.आपल्या प्रभावी कार्यशैलीने विवेकभैय्या कोल्हे यांच्यावर नागरिकांमध्ये कौतुकाचा वर्षाव होतो आहे त्यामुळे आमदार काळे अस्वस्थ झाले आहेत अशी प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी दिली आहे. 

चार दिवसांपूर्वी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सद्या तहसील विभाग आणि अन्यत्र सुरू असलेल्या गैर कारभारावर संताप व्यक्त केला.लोकप्रतिनिधींच्या खोट्या वल्गना यातून त्यांना फुरसत भेटून गेले सहा महिने लाभार्थी प्रस्ताव मंजुरीची बैठक घेता न आल्याने नागरिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.चाळीस वर्षे काय केले हे विचारण्याचा अधिकार आमदार काळे यांना नाही कारण त्यांनी कवडीचे योगदान नसताना जे शासकीय उद्घाटन केले ते पोलीस स्टेशन,पंचायत समिती,वाचनालय,बस स्थानक अशी असंख्य कामे कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेली आहे याचा विसर पडला असावा.

आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात तुमचा कार्यकाळ आजवर गेला.काळे कुटुंबाकडे यापूर्वीही दहा वर्ष असणाऱ्या सत्तेत तालुक्याच्या तोंडाला पाणी जाऊन पाने पुसण्याचे काम केले.अतिक्रमण करून शहरात नागरिक विस्थापित केले.कधीही आशुतोष काळे यांनी एकही सामाजिक उत्तरदायित्व असणारे काम करण्यात रस दाखवला नाही. कोपरगाव शहारला तुम्ही किती भूलथापा देऊ शकतात हे आम्ही ग्रामीण भागाने अनुभवले आहे.कवडीचा संबंध नसणाऱ्या केंद्राच्या योजनांचे पैसे स्वतःच आणले असे काळे यांनी दाखवने हास्यास्पद आहे.तीन हजार काय पाच हजार कोटी देखील म्हणायला कमी करणार नाही कारण यांना आपला नाकर्तेपना झाकण्यासाठी दुसरा मार्ग उरला नाही.

ज्या वैयक्तिक लाभार्थी योजना आहेत त्या कोल्हे यांनी जनजागृती केल्याने संख्यात्मक वाढ दिसते आहे यात काळे यांचे कवदीचे योगदान नाही.या उलट आमदार वल्गना करत असलेले आठ हजार प्रस्ताव पैकी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यालयातून सत्तर टक्के लोकांची कामे मार्गी लागली आहेत.याचे साक्षीदार लाभार्थी योजनांचे नागरिक आहेत त्यामुळे काळे यांचा केवळ सह्याजीराव कारभार सुरू आहे.प्रत्यक्षात कोल्हे यांनी हजारो लोकांना लाभ मिळवून दिला असा संदेश जाऊ नये म्हणून जाणीव पूर्वक काळे यांनी सहा महिने हे प्रस्ताव अडवून धरले होते.शेवटी आता जनतेचा रोष वाढल्याने त्यांना ते मंजूर करण्याची नामुष्की आली आहे म्हणून काळे यांचा तीळपापड होतो आहे अशी मतदारसंघात चर्चा आहे अशी प्रतिक्रिया पाचोरे यांनी दिली आहे.

काळे यांनी कोल्हेंच्या राजकीय अस्तित्वाची चिंता करू नये कारण पवारांना हातावर तुरी देऊन आता अजित दादांना पक्षाचे चिन्ह व अधिकार मिळाले त्याचा साधा जल्लोष काळे यांनी केला नाही यातच त्यांची राजकीय अस्वस्थता किती आहे हे उघड झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!