लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी बाभळेश्वर रोड वर डॉ. सुनिल निवृत्ती आहेर यांच्या गट नंबर १६२ मध्ये मकाच्या शेतात साधारण एक वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद झाला.
आज दिनांक ११/२/२०२४रोजी भक्षाच्या शोधात असताना एक वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला भक्ष म्हणुन ठेवलेली कोंबडीचा फडशा पाडत जेरबंद झाला.याची माहिती रावसाहेब आहेर यांनी प्राणीमित्र विकास म्हस्के यांना दिली. माहिती मिळताच विकास म्हस्के हे घटनास्थळी पोहोचले व वनविभागाच्या वरिष्ठांना माहिती दिली. वनरक्षक गजेवार, प्राणीमित्र विकास म्हस्के, डॉ सुनील आहेर, प्रा. महेश आहेर, डॉ.राजीव आहेर,भाऊसाहेब आहेर, तानाजी आहेर, सुनिल कदम, रावसाहेब आहेर, यांनी बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी पांगविण्यासाठी मदत केली.




