spot_img
spot_img

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रणाली पाटीलला विजेतेपद

बेलापूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- जामखेड महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत बेलापूरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रणाली पाटील हिने विजेतेपद पटकाविले.

प्रणाली पाटील हिने आजवर अनेक स्पर्धा गाजविल्या असून विजेतेपद मिळविले आहे. जामखेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने यश मिळवून आपली यशाची वाटचाल कायम राखली आहे. प्रणालीस प्राचार्य डाॕ.गुंफा कोकाटे यांचे सदैव मार्गदर्शन लाभते.

प्रणालीच्या यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अशोक साळुंके, हरिप्रसाद खटोड, अॕड.शरद सोमाणी, रविन्द्र खटोड, भारत साळुंके, अॕड.विजय साळुंके, बापुसाहेब पुजारी, राजेन्द्र खटोड, बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे आदिंनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!