अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- शासकीय आथवा खाजगी पदांच्या भरतीसाठी ज्या मुलाखती घेतल्या जातात त्यासाठी मुलाखतीचे तंञ अवगत करुन पूर्वतयारी तसेच आत्मविश्वासाची गरज असते, असे प्रतिपादन स्वामी सहजानंद भारती महाविद्यालयाचे डॉ.विजय पाटोळे यांनी केले.
अशोक कारखाना संचलित माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ अंतर्गत आयोजित तंञ मुलाखतीचे विषयाबाबतच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ.पाटोळे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉ.सौ.सुनिता गायकवाड होत्या.
प्रमुख आतिथी डॉ.पाटोळे यांनी मुलाखतीचे तंञ उलगडताना विद्यार्थ्यांना सर्वांकष मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मुलाखतीचे विशेष तंञ असते. कोणत्या पदासाठी मुलाखत द्यायची आहे त्या क्षेञाची माहिती मिळवून पूर्वतयारी करणे आवश्यक असते. यासाठी विविध क्षेञाचा वाचनाव्दारे अभ्यास केला पाहिजे. त्याचप्रमाणे आत्मविश्वासाने मुलाखत दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र व मंत्र याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रा.दिलीप खंडागळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अधिकारी प्रा.संगीता खंडिझोड यांनी केले, तर सुत्रसंचलन प्रा.मंदा तांबे यांनी केले. आभार प्रा.पायल सुराणा यांनी मानले.




