10.4 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

आयुष्याच्या प्रवासामध्ये वरदविनायक सेवाधाम हे सुखदायी स्टेशन – ह. भ. प. भगवताचार्य भगीरथ महाराज काळे

लोणी दि.११( जनता आवाज वृत्तसेवा ):जीवनाच्या प्रवासाचे स्टेशन श्री वरदविनायक सेवाधाम आहे. ज्ञानेश्वरी ही विश्वाला संदेश देणारा महान ग्रंथ आहे. आपल्याला वाचायचे असेल तर आपण ज्ञानेश्वरी वाचली पहीचे असे प्रतिपादन ह. भ. प. भगवताचार्य भगीरथ महाराज काळे महाराज यांनी केले.

श्री गणेश जयंती निमित्त लोणी खुर्द येथील वरदविनायक सेवा धाम येथे मंहत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित किर्तन महोत्सवात काळे महाराज बोलत होते.

यावेळी काळे महाराज म्हणाले, मनुष्य जिवन सुखी करायचे असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आयुष्याचा प्रवासामध्ये आपण कोठे तरी थांबले पाहिजे व राम नाम जप केला पाहिजे. भजन सेवा, किर्तन सेवा, अन्नदान सेवा व सेवा कार्य केले पाहिजे. त्याकरिता वरदविनायक सेवाधाम हे एक परिसरासाठी स्टेशन आहे. कोठे तरी थांबून आपल्या अहंकाराच्या काचा उतरवल्या पाहिजे, आपली गाडी थांबविली पाहिजे असे काळे महाराज यांनी सांगून ज्ञानेश्वरी उघडली तर तुम्ही माऊलीशी संवाद साधू शकता. महाराष्ट्र हा संतप्रधान आहे, आपल्या पासून खुप जवळ नेवासे, देहू, शिर्डी संत भूमी आहे. संतांनी आपले जिवन सोपे केले आहे. त्या मुळे संत विचार घेऊन आपण आपल जिवन जगल पाहिजे. ईश्वर व संत सेवा हिच आपल्याला उपयोगी पडेल त्यामूळे सावधान होऊन भगवान चिंतन जप केला पाहिजे. संप्रदाय हा कठोर आहे पण आपल्या भल्यासाठी उपयोगी आहे असे महाराज म्हणाले.

हरिकिर्तन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा सेवाधामचे प्रमुख गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंतं उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांनी उपस्थित भाविक भक्तांचे स्वागत करून आभार मानले . या कीर्तनप्रसंगी पंचक्रोशीतील भजनी मंडळी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!