spot_img
spot_img

श्रीरामपुरात चॉपरने वार करत तरुणांची निर्घुणपणे हत्या

श्रीरामपूर(जनताआवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर शहरातील गोंधवणी  रोड परिसरात एका तरुणावर  चॉपरने सपासप वार करत त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली.

 काहीतरी किरकोळ कारणावरून तनवीर शहा, रुपेश शिंदे, सुनील देवकर यांची कुरबुर झाली. नंतर त्यांचे भांडणामध्ये रूपांतर झाले. आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग धरून दुसऱ्या दिवशी पहाटे गोंधवणी रोड परिसरात तन्वीर शहा थांबलेला असता त्या ठिकाणी रुपेश शिंदे आणि सुनील देवकर आले. त्यांनी तनवीर शहा याला अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळचे रूपांतर नंतर हाणामारी झाली त्यावेळी तनवीर शहा याच्यावर चॉपरने 8 ते 10 वार करण्यात आले.

 यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. तनवीर शहा यांच्यावर  चॉपरने वार केल्यानंतर आरोपी लगेच त्या ठिकाणाहून पसार झाले आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी  यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थिती नियंत्रण ठेवून आहेत. पसार झालेल्या आरोपींचा  तपास हा पोलीस यंत्रणा करीत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक गवळी यांनी दिली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!