spot_img
spot_img

शिर्डी संस्थान मधील आकृतीबंधातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतन वाढ- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी दि.९( जनता आवाज वृत्तसेवा ):-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शिर्डी संस्थान मधील आकृतीबंधातील मंजूर पदांवर नियुक्त असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आल्याने कंत्राटी कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कंत्राटी कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरवा केला होता.यापुर्वी विधी व न्याय मंत्री असताना १०५२ कर्मचा-यांना संस्थान सेवेत कायम करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.

उर्वरीत कर्मचा-यांच्या वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्तिगत पाठपुरावा करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे विधी व न्याय विभागाने शासन आदेश काढून ४० टक्के वेतनवाढ देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे संस्थानला कळविल्याने सेवेत असलेल्या आकृतीबंधातील कंत्राटी कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.या मागणीसाठी कर्मचार्याचा मोठा संघर्ष झाला.परंतू संस्थान समितीने सहानुभूती दाखवून हा निर्णय होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत कायम करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असतील आशी
ग्वाही त्यांनी दिली आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!