33.1 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

उक्कलगावात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

उक्कलगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- तालुक्यातील उक्कलगाव येथील श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या पावन भुमीत गावकरी भजनी मंडळ तसेच देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्यासह समस्त ग्रामस्थांच्या वतीने येत्या बुधवारपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

अखंड हरिनाम सप्ताहाचे हे तिसरे वर्ष आहे.श्री संत योगीराज गंगागिरी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने आणि सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज तसेच लोणी श्री वरद विनायक सेवाधामाचे महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली बुधवार (दि.१४)रोजी ते (दि.२१) रोजी या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला.या सोहळ्यानिमित्ताने सकाळी काकड आरती,ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,हरिपाठ व सायंकाळी प्रसिद्ध किर्तनकर यांचे किर्तनरूपी सेवा होणार आहे.तसेच ‘श्री’चा अभिषेक, ध्वजपूजन,कलशपूजन,व वीणा,टाळ,मृदंग,पूजन करण्यात येणार आहेत.यावेळी ह भ प बाबा महाराज मोरे, ह भ प नामदेव मोरे ह भ प रविंद्र मुठे ह भ प उल्हास महाराज तांबे ह भ प बाबा महाराज ससाणे यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठावरून वाचन केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ………

  नामवंत कीर्तनकाराचे कीर्तनरूपी सेवा 

 ह भ प स्वरभास्कर अनंत महाराज काळे (संगमनेर), किर्तन मर्मज्ञ ह भ प दिपक महाराज देशमुख ( अकोले ) वारकरी भुषण ह भ प अनिल महाराज पाटील ( बार्शी) समाज प्रबोधनकार ह भ प चंद्रकांत महाराज खळेकर ( खंडाबे) युवा किर्तनकार ह भ प अक्षय महाराज उगले( जेऊर हैबती) विनोदाचार्य ह भ प सुधाकर महाराज वाघ ( पैठण) मुदुंगमहर्षी ह भ प युवराज महाराज देशमुख(आळंदी) यांचे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तनरूपी सेवा होणार आहेत.शेवटी बुधवारी (दि.२१) रोजी सकाळी १० ते १२ वाजता या वेळेत वैराग्यमुर्ती ह भ प एकनाथ महाराज चत्तरशास्त्री ( कान्हूर पठार ) यांच्या सुमधूर वाणीतून काल्याच्या कीर्तन सांगता होईल.त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडले.अशी माहिती भजनी मंडळाने दिली. 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!