33.2 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

सलग दुसऱ्या दिवशी लोणीत बिबट्या जेरबंद

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील बाळासाहेब ब्राम्हणे यांच्या मकाच्या शेतात साधारण दीड वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के, वनरक्षक प्रतिक गजेवार, घटना स्थळी पोहचले व कोपरगावच्या वन परिक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा सोनवणे यांना माहिती दिली.

आज सकाळी एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याच मकाच्या शेतात दुसरा बिबट्या आढळला. आणि बिबट्या पाहण्यासाठी लोकांनी खुप गर्दी केली होती. ती गर्दी पांगवण्यासाठी व पुढील धोका ओळखुन लोणी पोलीस स्टेशन ने गाडी पाठवली व गर्दीवर नियंत्रण केले.

यावेळी डॉ सुनील आहेर, अजय बोधक, अनिल जाधव, अमोल ब्राम्हणे, नानासाहेब ब्राम्हणे, सुधीर ब्राम्हणे, दशरथ सोनवणे, मंडू खेमणर हजर होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!