लोणी दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा ):-
शिक्षणातून विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न पुर्ण करुन आत्मविश्वासाने पुढे जावे. आपल्या क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण करा. आपल्या पंखात बळ देण्यासाठी प्रवरा परीवार आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीतिई विखे पाटील यांनी केले.
लोणी पायरेन्सच्या आयबीएमएच्या वार्षिक संमेलन आणि उडान २०२४ निमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. विखे पाटील बोलल होत्या. यावेळी माजी विद्यार्थी समीर शहा, विरेंद्र कर्नावंत, संस्थेचे सचिव डॉ. निलेश बनकर, संचालिका डाॅ.अनिता खटके
आदीसह पालक विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, प्रवरेतून घडणारा विद्यार्थी हा आदर्श असतो. मुलीनी शिक्षणातून पुढे जावून स्वयंपुर्ण व्हावे यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे.असे सांगून नॅक नामाकंन मिळाल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन केले.
प्रवरेच्या भूमीतून नवी ऊर्जा आणि प्रत्येक गोष्टी साठी मिळणारे प्रोत्साहन यामुळे प्रवरेचा विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे असे माजी विद्यार्थी विरेंद्र कर्नावंत यांनी सांगून शिक्षणातून मोठं व्हा आकाशात उंचभरारी घ्या. नोकरी आणि स्वयंरोजगातून पुढे जा नवीन शिकत रहा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. यावेळी वर्षभरात विविध क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक यांचा गौरव मान्यवरांनी केला.