लोणी दि.१२ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्री वरदविनायक सेवाधाम येथे होणारे उत्सव हे आपल्या साठी दिवाळीच आहे, आपण सर्व जण भाग्यवंत आहोत हा लाभ आपल्याला मिळतो असे प्रतिपादन ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी कीर्तन केलै..
यावेळी ह.भ.प. रोहिणीताई परांजपे म्हणाल्या, आपल्याला खूप प्रश्न असतात व उत्तरे शोधण्यासाठी आपण वण वण फिरत असतो. खरे काऊंसलेर संत आहेत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत त्यामूळे ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, माऊलीचे पाय धरा, समर्थांचे पाय धरा असा उपदेश त्यांनी केला. माणूस हा प्रपंचामधे खुप आडकला आहे. प्रपंच सवडीने व परमार्थ आवडीने करावा. परमार्थ करताना चैतन्य शक्तीचा लळा लागला पाहिजे असे त्या म्हणाल्या. तेजोमय जो असतो त्याला काय प्रकाश व काय काळोख. संत हे सूर्यासारखेच तेजोमय असतात, त्यांच्या प्रेमात पडण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा. भगवंत भेटला की जीवनातील सर्वच प्रश्न सुटतील कोणताही विरह राहणार नाही. खरा परमानंद हा धर्म मंडपात मिळतो. वारकरी पंथ हा विश्वपंथ होतोय, हीच आपली दिवाळी आहे असे त्या म्हणाल्या.
रोहिणीताई परांजपे यांचे संत पूजन सौ शालिनीताई विखे यांनी केले. कीर्तन प्रसंगी सौ शालिनीताई विखे पाटील,विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासनाना तांबे पाटील,ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदूशेठ राठी, प्रमोद रहाण , प्रभांजन महाराज, योगेश कांदळकर महाराज, बाबा मोरे महाराज, नामदेव शास्त्री महाराज, भारत धावणे महाराज अदी महाराज मंडळी व भाविक भक्त उपस्थित राहून कीर्तन श्रावणाचा आनंद घेतला.
हरिकिर्तन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा सेवाधामचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.महंतं उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांनी उपस्थित भाविक भक्तांचे स्वागत करून आभार मानले . या कीर्तनप्रसंगी पंचक्रोशीतील भजनी मंडळी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.