23.4 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर मधील महिलांच्या उस्फूर्त प्रतिसादाने भारावून गेले – वर्षा उसगावकर हळदी कुंकू समारंभानिमित्त रंगला खेळ पैठणीचा

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-  श्रीरामपूर मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून भारावून गेल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले आहे. साई सोशल फाउंडेशन, श्री शक्ती ग्रुप व श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी वर्षा उसगावकर यांनी सौ. ससाणे व सौ. ओगले यांचे कौतुक केले तसेच माजी नगराध्यक्षा श्रीमती. राजश्रीताई ससाणे यांच्या कार्याचाही गुणगौरव केला . यानंतर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संगमनेरच्या विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख यांनीही मा.आ स्व.जयंतराव ससाणे यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. दिपालीताई ससाणे म्हणाल्या,की महिलांनी आत्मनिर्भय बनून स्वतः मध्ये असणाऱ्या गुणांचा शोध घेतला पाहिजे. स्व जयंतराव ससाणे साहेबांच्या जनविकासाचा वारसा घेऊन आम्ही महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतो.

मकर संक्रांति निमित्त आयोजित खेळ पैठणीचा स्पर्धेत महिला, युवतींपासून वयोवृद्ध आजीबाईंनी देखील उस्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सौ ससाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यानंतर साई सोशल फाउंडेशनच्या सौ नीती ओगले म्हणाल्या की,महिलांना कौटुंबिक कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा व महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सदर कार्यक्रमात निवेदक रमेश परळीकर यांनी महिलांचे विविध मनोरंजक खेळ प्रकार घेऊन भाग्यवान विजेते निवडले. भाग्यवान विजेत्यांना पैठणी साडया तसेच इतर विविध बक्षिसे देण्यात आली.

याप्रसंगी मा. नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, मा.जि.प. सदस्या आशाताई दिघे, मा. नगरसेविका सुनंदाताई जगधने, राजश्री सोनवणे, मंगल मुथा, मीराताई रोटे, आशा रासकर, भारतीताई परदेशी, संगीता मंडलिक, मंगलताई तोरणे, दत्तनगरच्या सरपंच सारिका कुंकलोळ, रोहिणी बोलके, मंजुषा गलांडे, नीता नवले, माधुरी नवले,आशा परदेशी, श्री शक्ती ग्रुपच्या अध्यक्षा माधुरी सोनवणे, उपाध्यक्षा राजश्री वैद्य, शक्ती सुपर सी च्या समन्वयक राणी दिसर्डा, भारती रासकर तसेच अनेक माजी नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्या, सहेली ग्रुप च्या सदस्या आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!