अहमदनगर (जनता आवाजवृत्तसेवा):- अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या तीन चार दिवसापासून संगमनेर, कोल्हापूर अशा ठिकाणी औरंगजेबचे उदात्तीकरण केल्यावरून दंगल सदृश स्थिती असतानाच श्रीगोंदा येथे एका परप्रांतीय तरुणांने अश्याच प्रकारे सोशल मीडियावर पोस्टर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाला जागृत नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने पुढील अनर्थ टळला.
सोशल मीडियावर औरंगजेब पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
याबाबत बजरंग दलाचे संयोजक कालीदास मोहन कोथिंबीरे यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, गुरूवारी (दि.8) सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास त्यांचेे मित्र तेजश कोथंबीरे यांच्या व्हॉटसअपला एक स्क्रीन रेकॉर्डींग पाठवली गेली होती. सदर स्क्रीन रेकॉर्डींंगची पाहणी केली असता ती फेसबुक या सोशल मीडीया अॅप वरील एका अकाउंटवर ठेवलेल्या स्टोरीचा होती. यामध्ये औरंगजेबचे उद्त्तीकरण केल्याचे दिसून येत होते.
या फेसबुक खात्याबाबत माहिती घेतली असता सदर खाते हे मोहम्मद आरिफ फुल्स हरीफ अन्सारी ( 21, रा. छितरौली, मुजफरपूर राज्य बिहार. सध्या रा.जकाते वस्ती, श्रीगोंदा) याचे होते तो श्रीगोंद्यातील संजय सायकल मार्ट येथे काम करत असल्याने कोथिंबीरे यांनी गणेश गाजुरे, अमोल हिरनवाळे, यांना घेऊन ते संजय सायकल मार्ट येथे गेले असता तेथे आरिफ हा मिळून आला. त्याला त्याच्या फेसबुक खात्याबाबत विचारले असता सदर हे खाते त्याचेच असल्याचे त्याने मान्य केले. या फेसबुक खात्याची लिंक पाहिली यानंतर सदर स्टोरी ही त्यानेच टाकल्याने त्यास सोबत घेवून समक्ष पोलीस ठाण्यात पोहच करण्यात आले. या प्रकरणी अन्सारी यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले काही चार तीन चार दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये समाजकंटक कडून जाणीवपूर्व अशा प्रकारच्या घटना केल्या जात आहे. याकरिता पोलीस प्रशासन हे अशा प्रकारच्या घटना घडू नये याची नोंद घ्यावी व सतर्क रहावे.



