28.5 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

खेड्याकडे चला संदेश देत प्रवरेच्या भुमीपुञाची सहकार पंढरीत बहुराष्टीय कंपनी लोणीत बहुराष्ट्रीय कंपनी…

लोणी दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आशुतोष छगनराव पुलाटे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने पी.९९ सॉप्ट डिजीटल या बहुराष्ट्रीय कंपनीची सुरूवात करून नवी संधी निर्माण केली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.

दुर्गापूर (ता राहाता) येथील प्रयोगशील शेतकरी आणि प्रवरा बॅकेचे माजी संचालक छगनराव पुलाटे यांचा आशुतोष हा मुलगा परिस्थिती चांगली असतानाही गावातील प्राथमिक मराठी शाळा, प्रवरा माध्यामिक विद्यालय दुर्गापूर, विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, लोणी आणि प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी येथून संगणक अभियंता असा त्यांचा शैक्षणिक प्रवास नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करत आपल्या उणिवा शोधत पुणे ते अमेरिका हा नोकरीचा प्रवास करतांनाच ग्रामीण विद्यार्थी हा हुशार, प्रामाणिक आणि जिद्दी आहे त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा उद्देश ठेऊन पी. ९९ सॉप्टवेअर डिजीटल प्रा. ली. ही कंपनी सुरु केली. सध्या कंपनीच्या माध्यमातून विविध देशातील प्रोजेक्ट सुरु आहे. अमेरिका, हैद्राबाद बंगलोर, पुणे येथे कंपनीचे ऑफीस असून माझा गांव ही कमी नाही ज्या परिसराने जगाला सहकारचा संदेश दिला तेथे कंपनीचे ऑफीस सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या कंपनीमध्ये नव्वद संगणक तज्ञ असून साॅप्ट वेअर मधील अनेक देशाचे प्रोजेक्ट सुरु असून यामाध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल आहे.

ग्रामीण भागात सुरु झालेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीच्या शाखेतून ग्रामीण मुलांना रोजगार मिळण्याबरोबरचं प्रवरेचा माजी विद्यार्थी हा कर्मभुमीसाठी प्रयत्न करतो आहे हा आनंद मोठा अससे सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी सांगितले.

प्रवरा शैक्षणिक संकुलातून मिळालेले शिक्षण हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य युवकांना रोजगार देण्यासाठी हा उपक्रम असून महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा शैक्षणिक संकुलात दिलेल्या सुविधामुळे या कंपतीमध्ये ग्रामीण विद्यार्थ्याना मोठी संधी उपलब्थ होत आहे असे आशुतोष पुलाटे यांनी सांगिलते.

यावेळी विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासनाना तांबे, गोवा- महाराष्ट्र बार असोसिएशनचे अँड आर. बी. पुलाटे,प्रवरा बॅकेचे माजी संचालक छगणराव पुलाटे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.मंदाताई डुक्रे,पोलिस पाटील दिलीप पुलाटे आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!