श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ मध्ये लेखाशीर्ष ५०५४ इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत पाच कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
आ. कानडे म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यातील दिघी ते चितळी रस्ता मजबुतीकरण करणे दहा लक्ष, कुरणपूर ते नांदूर रस्ता ५३ डांबरीकरण करणे २५ लक्ष, उंबरगाव ते एमडीआर ६ रस्ता मजबुतीकरण व सुधारणा करणे दहा लक्ष, लाडगाव ते कारेगाव ग्रामा ९८ मजबुतीकरण करणे व सुधारणा करणे दहा लक्ष, ममदापूर (राहता तालुका हद्द) ते फत्याबाद रस्ता मजबुतीकरण व सुधारणा करणे दहा लक्ष, प्रजिमा २१ ते जुना वळदगाव रस्ता (मौजे वळदगाव् बेलापूर पढेगाव रोड ते जुना वळदगाव हनुमान मंदिर रस्ता) ग्रामा ९७ मजबुतीकरण व सुधारणा करणे २५ लक्ष, इजिमा ३३९ ते रासकर बोंबलेवस्ती रस्ता (प्रजिमा २१ तेशेटे वस्ती ते जुना वळदगाव) ग्रामा १६७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे २५ लक्ष, जुने नायगाव ते जाफराबाद रस्ता मजबुतीकरण करणे २५ लक्ष, मौजे पढेगाव ते बनकर वस्ती रस्ता (उंबरगाव फरशी ते शकु बाबा जुना पढेगाव रस्ता) मजबुतीकरण करणे २५ लक्ष, जुना ममदापूर रस्ता ते (इजीमा २२० गळनिंब ते जाटे वस्ती) ग्रामा ७७ रस्ता डांबरीकरण करणे २५ लक्ष, फत्याबाद ते चांडेवाडी रस्ता ग्रामा ५६ डांबरीकरण करणे २५ लक्ष, राहाता तालुका हद्द तांबेवाडी ते मांडवे जोडमार्ग (मांडवे ते तांबेवाडी पावले वस्तीपर्यंत) ग्रामा ३१ मजबुतीकरण व सुधारणा करणे २५ लक्ष, कडीत खुर्द ते तांबेवाडी रस्ता (ग्रामा २९) मजबुतीकरण व सुधारणा करणे २५ लक्ष, कडीत खुर्द ते तांबेवाडी (तिसगावकडे जाणारा) ग्रामा ३० रस्ता मजबुतीकरण सुधारणा करणे २५ लक्ष, पढेगाव ते कान्हेगाव रस्ता ग्रामा २३ मजबुतीकरण करणे २५ लक्ष तसेच इजीमा ४० ते शेजुळ वस्ती रस्ता ग्रामा १६९ मजबुतीकरण करणे २५ लक्ष अशा एकूण तीन कोटी चाळीस लक्ष रुपयांचा कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
तसेच राहुरी तालुक्यातील संक्रापूर दवणगाव शिव रस्ता (ग्रामा ४२) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ३० लक्ष, महाडुक सेंटर ते माहेगाव रस्ता (नवनाथ आढाव किराणा दुकान ते सुरेश घेवरकर वस्ती) मजबुतीकरण डांबरीकरण करणे २० लक्ष, जातप ते खरात वस्ती बोंबले वस्ती जोड रस्ता (वाकण रस्ता) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २५ लक्ष, जातप ते गडाख वस्ती खंदे वस्ती रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे २५ लक्ष, पाथरे वळण रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे (ग्रामा ८६) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २५ लक्ष, प्रजिमा १५७ (बेलापूर खुर्द-आंबी) रस्त्यापासून केसापूर टाकसाळ वस्ती ते चारी नंबर २ रस्ता मजबुतीकरण करणे २५ लक्ष आणि चांदेगाव सिनारे वस्ती ते करजगाव रस्ता (ग्रामा २९) मजबुतीकरण करणे १० लक्ष अशा एक कोटी ६० लक्ष रुपये खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले. या कामांच्या निविदा निघाल्यानंतर तातडीने या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.