लोणी दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा ):-भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवसाचे महत्व हे खूप मोठे आहे. मातृ-पितृ दिनाचे महत्व शाळांमध्ये आधोरेखीत झाल्यास विद्यार्थ्यांवरही चांगला संस्कार होण्यास मदत होईल.म्हणूनचं प्रवरेच्या शाळामध्ये शिक्षणांसोबतचं संस्कृतीचे ही ज्ञान दिले जाते.
असे प्रतिपादन लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांनी केले.
लोणीच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर येथे मातृ-पितृ पुजन कार्यक्रमात सौ.सरोदे बोलत होत्या. यावेळी प्राचार्य सौ. भारती कुमकर,मुख्यध्यापिका सौ.सिमा बढे, लोणी येथील योग वेदांत समितीचे बाळासाहेब आहेर, दत्ताञय कोरडे,लालचंद आसावा,ललित आसावा,राजेंद्र शिंदे,सुनिता आसावा आदीसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. सरोदे म्हणाल्या, आपली संस्कृती ही महान आहे. तिचे जतन करतांनाच वेगवेगळ्या कार्यक्रमातून ती विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्याचे प्रवरेत होत आहे. संस्कारक्षम पिढीसाठी घरातील आई-वडील, आजी-आजोबा हे मुलांसाठी चालले बोलते विद्यापीठ आहे. जिल्हा परिषदेना माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी भारतीय सण-वार आणि विविध उत्सव यातून संस्कृतीचे जतन केले जाते. विद्यार्थ्यांनो जीवनात मोठं व्हा आई-वडीलांचा आदर करा त्यांना विसरू नका हा संदेश दिला प्रारंभी दत्तात्रय कोरडे यांनी या उपक्रमाची माहीती दिली याप्रसंगी होस्टेलमध्ये असलेल्या मुलींना त्यांच्या आई-वडिलांची आठवण आल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते.परंतु शिक्षकांचे पुजन करत त्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
“प्रवरेच्या शैक्षणिक संकुलात मातृ-पितृ पुजन करत व्हेलेंटाईन डे ला फाटा देत मातृ-पितृ पुजन करत भारतीय संस्कृतीचे ज्ञान विद्यार्थ्यांना देत आई-वडीलांचा आदर करा हा संदेश देण्यात आला.