यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न समाजाला प्रेरणा देणारे यश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत समर्पक व साधेपणाने उत्तर देत पोपटराव पवारांनी त्यांच्याशी संवाद साधला या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत अभ्यासपूर्ण व समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरतील असेही पवार म्हणाले.
सोनईत यश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घेतली पोपटराव पवारांची मुलाखत.विद्यार्थ्यांनी साधला पद्मश्री संवाद
नेवासा फाटा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-विद्यार्थ्यांनी पद्मश्री पोपटराव पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी पोपटराव पवार यांनी सर्व प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे दिली. हे सर्व विद्यार्थी होते सोनई येथील यश अकॅडमी सीबीएससी स्कूलचे. यावेळी पवारांनी आपल्या जीवन कार्याचा आढावा मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडला केला.
विद्यार्थ्यांनी पोपटराव पवार यांना सामाजिक, राजकीय, खेळ, शैक्षणिक, व्यसनमुक्ती, निसर्ग सौंदर्य व इतर अन्य अनेक विषयांवर मुलाखती दरम्यान प्रश्नोत्तराद्वारे विद्यार्थी व पवार यांची झालेली चर्चा अशी…
प्रश्न – 1990 साली जेव्हा तुम्ही तुमच्या गावात परतला. तेव्हा तुमच्या मनात गावची परिस्थिती पाहून काय विचार आले.
उत्तर – माझे शिक्षण केडगावला झाले. अकरावी व बारावी रेसिडेन्शियल कॉलेजला केले. मला क्रिकेटची आवड असल्याने शालेय क्रिकेट क्रिकेट स्पर्धा खेळलो. अंतर ऑल इंडिया क्रिकेट मध्ये खेळलो क्रिकेटमध्ये करिअर करायचं ठरवलं होतं. आम्ही वाडिया पार्कला क्रिकेट खेळायचो तेव्हा गावाकडील मुलं वाडियापार्कला ते बघायचे. गावाकडे निवडणुका व्हायच्या गावाकडील मुलांबरोबर खूप मस्ती करायचं झऱ्याचं पाणी प्यायचं ,निसर्ग उत्तम असायचा आंब्याचे पाड चोरायची मग त्या आंब्याचा मालक शाळेमध्ये शिक्षकांकडे तक्रार करायची त्यावेळी असं समजलं जायचं ज्याच्या शर्टला आंब्याचा डाग त्याचे आंबे पिकलेले असायचे ज्याचा हात किंवा पाय मोडलेला असायचा त्यावेळी कळायच की त्याची जांभूळ पिकली आहे. डोके फुटलेले असले तर समजायचं बोर पिकली या सर्व मौज मस्ती आम्ही करायचं. सारेगाव प्रत्येक सणाला उत्सवाला अंत्यविधीला एकत्र असायचं. गावात व आमच्या घरी अनेक नामवंत पैलवान येऊन गेले. गावातील काही पैलवान दूध सोडून दारूकडे वळाली हे सर्व 1990 ला पाठवलं मग बालपणीचे संस्कार आठवण गावचा विकास करणे हा एकच ध्यास मनाशी बाळगून गावात प्रवेश केला.
प्रश्न – कोरोना काळात सर्व जग बंद असताना आपण आपल्या हिवरे बाजारची शाळा ऑफ लाईन कशा पद्धतीने चालवली.
उत्तर – कोरोनामुळे जग बंद होतं. जग भयभीत झालं होतं सर्वात जास्त नुकसान मुलांचा झालं. वन्यजीव मुक्तपणे फिरत होते वाघोबा बिबट्या खुश होते कुठेही दिसायचे. जेलमध्ये मनुष्यप्राणी होते म्हणजे बंदिस्त. आमची फ्रंटलाईन टीम होती. 68 पॉझिटिव्ह वाले मग प्रश्न भरायला रेमडिसीवर मृत्यूचे प्रमाण कोरंटाईन पण सर्वांनी एकत्र येऊन सहा टीम 12 मुद्दे 15 जूनला शाळा सुरू करायची ठरवली. कोविड होत नव्हता. फेजमध्ये मुलांना कोविड झाला पण तो काही अल्पशा प्रमाणात. 15 जून ते 15 एप्रिल शाळा चालवली मुलांचं नुकसान झालं असतं. मुल स्कॉलरशिप ला आली मनाने मुलं भक्कम झाली होती आणि मुलांमुळे घरच्यांची भीती सुद्धा दूर झाली होती. एकच ठरवलं होतं कोरोनाची भीती दूर करायची शाळा चालून गावाला कोरोनामुक्त करायचं.
प्रश्न -आम्हा विद्यार्थ्यांना ध्येयपूर्तीसाठी काही मोलाचा सल्ला आपण द्याल का?
उत्तर – सर्वात प्रथम कुटुंबाचे संस्कार- पैसा हा महत्वाचा नाही त्यानंतर प्रत्येकाने निर्व्यसनी,राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रेम, जिव्हाळा, ममता, शिक्षण, नोकरी त्यानंतर लग्न, प्रत्येकाचे स्वप्न म्हणजे – गावाचा विकास, देशाचा विकास, पूर्ण करण्याचं ध्येय -आध्यात्मिक बैठक पाहिजे- आंतरिक प्रेरणा महत्त्वाची आहे चिंतन प्रेरणा. हा माझा मोलाचा सल्ला असेल.
यश अकॅडमीच्या मुलाखतीमध्ये सृष्टी वीरकर, संहिता बानकर, गार्गी गडाख, तनिष्का डाके, वेदिका गडाख, शर्वरी सावंत, अपूर्वा माळी, अनुष्का शिंदे, शुभम इंगोले ,श्रेयस लाटे, वेदांत दरंदले ,वेदांत जायगुडे ,साई ईखे, अजित पवार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या हेतूने उदयन गडाख यांच्या संकल्पनेतुन मुलाखत प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची हा उपक्रम साकारण्यात आला याचे सर्वांनी स्वागत केले.



