लोणी दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी अनिकेत राऊत याची मॅनकाइंड फार्मा तर अनिकेत गावडे, अभिषेक दिघे, समीरन वामन यांची मॅकलॉईड फार्मासुटीकल या कंपनीमध्ये अनुक्रमे मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह व फरमन्टेशन प्रोडक्शन अधिकारी म्हणून निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी यांनी दिली.
पाचव्या अधिष्ठाता समितीने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालच्या पदवीमध्ये बदल करून बी. टेक. बायोटेक्नॉलॉजी करण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राबरोबरच आता फार्मासुटीकल कंपनीमध्येही नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालेल्या आहे.
या नोकरीसाठी अनिकेत राऊत याला ४.३ लाख, तसेच अनिकेत गावडे, अभिषेक दिघे आणि समीरन वामन याला प्रत्येकी ३ लाखाचे पॅकेज देण्यात आले.
सदर विद्यार्थ्यांचे यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.सुजय विखे पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, संचालिका सौ.लिलावती सरोदे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी, तसेच संस्थेचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी मनोज परजने, महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी भाऊसाहेब घोरपडे आणि इतर शिक्षक वृंदाने अभिनंदन केले.