सादतपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-संगमनेर तालुक्यातील सादतपुर येथे दिनांक २५/१/२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान नरभक्षक बिबट्याने हर्षल राहुल गोरे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता त्या हल्ल्यात हर्षल मयत झाला.त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गोरे कुटुंबियांच्या घरी भेट देवून सांत्वन केले होते. नरभक्षक बिबट्याला लावकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश त्यांनी वनविभागाला दिले होते.
शासनाच्या स्थायी आदेशा प्रमाणे तात्काळ दहा लाखाची मदत असुन पुढील पाच वर्षासाठी दहा लाखाची एफ. डी. करण्यात येणार आहे.त्यानंतर दहा वर्षांसाठी पाच लाखाची एफ.डी.व नविभागामार्फत कऱण्यात येणार आहे अशी एकुण २५ लाख रुपयांची मदत गोरे कुटुंबीयांना होणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी सौ सुवर्णा माने यांनी दिली.
सध्या दहा लाखाचा धनादेश सुपूर्त करताना संगमनेर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सागर केदार, यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी तसेच प्राणीमित्र विकास म्हस्के, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, पोलिस पाटील सुनिल मगर, संजय मगर, बबनराव काळे, दगडू शिंदे, ज्ञानदेव गुंजाळ, रमेशराव मगर, गोरक्षनाथ मगर, दिलीप मगर, विजय डेंगळे, रमेश कडू, अजय शिंदे, आदी उपस्थित होते.