आज सकाळी त्यांना त्यांना त्याच्या लॕबोरेटरीशेजारील असणारे दुकानदार तसेच मिञ वसंत ताठे यांचा मोबाईल व्दारे काॕल आला त्यांनी सांगितले की,तुमच्या मातोश्री क्लिनीकल काॕम्युटराईजड लॕबोरेटरीची नासधूस करुन चोरी झाली आहे.
पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील मातोश्री क्लिनीकल काॕम्युटराईजड लॕबोरेटरीची नासधूस करुन चोरी दिंव्याग व्यक्ती डाॕ. विठ्ठल गायकवाड यांच्या क्लिनीकल लॕबोरेटरीची नासधूस
पाथर्डी- ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील मातोश्री क्लिनीकल काॕम्युटराईजड लॕबोरेटरीची नासधूस करुन चोरी झाली आहे.अशी माहीती लॕबचालक डाॕ. विठ्ठल गायकवाड यांनी दिली आहे.
सविस्तर माहीती अशी की,
तिसगाव येथे उपबाजार समिती दालनासमोर व चितळे हाॕस्पिटल शेजारी मातोश्री क्लिनीकल काॕम्युटराईजड लॕबोरेटरी असून या ठिकाणी डाॕ.विठ्ठल गायकवाड हे याठिकाणी लॕबमध्ये रुग्णासाठी असणाऱ्या विविध टेस्ट चाचण्या लॕबमध्ये घेतात.
यानंतर लगेचच डाॕ.गायकवाड आपल्या मातोश्री क्लिनीकल लॕबमध्ये गेले असता लॕबच्या छताचा पञा कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला.तसेच लॕबची नासधूस केली. लॕबचे शटर तोडलेले दिसून आले.तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या टेबलच्या कपाटाची उचक पाचक करुन साहित्य अवास्तव दिसून आले आहे.काही दोन ते तीन हजार रुपये कपाटामध्ये होते ते चोरीला गेले असल्याचे सांगितले.तसेच पाथर्डी पोलिस स्टेशनला मोबाईल काॕल करुन झालेला प्रकार कळवला आहे.
मी एक दिव्यांग व्यक्ती असून मला विनाकारण कायमच कारण नसताना सतत ञास दिला जात आहे.जाणीवपूर्वक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा केला आहे.झालेला प्रकार माझ्यासाठी धक्कादायक आहे.
डाॕ.गायकवाड यांनी यावेळी सांगितले.



