संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा ):-संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारामध्ये पुणे नाशिक महामार्गावरील पुलाखालील म्हानोटी नदीच्या ओढ्यात अंदाजे 55 ते 60 वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह कुणीतरी अज्ञात इसमाने ज्वलन शील पदार्थ टाकून जळालेल्या अवस्थेत आढळुन आला आहे या व्यक्तीचा नेमका कोणी घातपात केला की काय याचा संगमनेर शहर पोलीस शोध घेत आहे
संगमनेरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारातील उड्डाणपुलाच्या खाली अस णाऱ्या म्हानुटी नदीच्या ओढ्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह मंगळवारी आढळून आला आहे.सदर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून संपूर्ण अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला आहे. त्यामुळे चेहरा विद्रूप झाला आहे. ॲसिड टाकल्याचा पोलिसांना संशय आहे.
या घटनेची माहिती संगमनेर उप विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहराचे पो नि भगवान मथुरे, उपनिरीक्षक निवांत जाधव, पो कॉ आत्माराम पवार यांनी तत्काळ घटना स्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे या व्यक्तीच्या अंगावर फक्त हाफ काळी पॅन्ट आहे. गळ्यामध्ये फक्त रुद्राक्षाची माळ आहे. उजव्या हातामध्ये मनी असलेला धागा बांधलेला आहे.सड पातळ बांधा दिसत आहे. उंची साधारण 165 सें मी आहे. याबाबत पोलिसांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाच्या विरोधा मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहे