संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- भाऊसाहेब वाकचौरे पक्ष सोडून गेले होते, ते परत आले. त्यांनी शिवसेना चोरली नाही. परंतू सध्याच्या खासदाराने गद्दारी करून शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली. येणाऱ्या निवडणूकीत शिवसेना सोडून गेलेल्या सर्व गद्दारांना गाढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
संगमनेर येथील बस स्थानकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खा. संजय राऊत, मिलींद नार्वेकर, वरूण सरदेसाई, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, संपर्कप्रमुख ॲड दिलीप साळगट शहर प्रमुख आप्पासाहेब केसेकर विधानसभा संघटक कैलास वाकचौरे उपशहर प्रमुख पप्पू कानकाटे माजी शहर प्रमुख अमर कतारी महिला आघाडी प्रमुख शितल हासे दिव्यांग सहाय्य सेना जालिंदर लाहामगे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण अमोल कवडे मुस्लिम मावळा आजीज मोमीन गुलाब भोसले अशोक सातपुते संदीप राहणे सर शिवसैनिक मोठ्या संख्येने
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मोदींना आमची घराणेशाही खटकते. हो मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. प्रबोधनकारांचा नातू, शिवसेना प्रमुखांचा पूत्र म्हणून मला किंमत आहे. माझ्या घराण्यावर प्रेम करणारी जनता आहे. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी साथ दिली नसती तर मोदी आज दिसले नसते, असेही ठाकरे म्हणाले. भाजपवाल्यांनी खासदार, आमदार फोडले पण, त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहेत, हे यावरून सिद्ध होते. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत येथून निवडूण येईल तो शिवसेनेचा उमेदवारच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर बोलतात. मग अशोक चव्हाण घराणेशाहीचे नाहीत का, असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले, हक्कासाठी दिल्लीकडे निघाले ल्या शेतकऱ्यांना अडविले जात आहे, पोलिसांकडून लाठ्या-काठ्या, अश्रूधुर सोडला जात आहे. ज्या स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला, त्यांच्या शिफारशी लागु करण्याच्या मागणी साठीच तर शेतकरी आंदोलन करीत असल्याचे ठाकरे म्हणाले. देशभक्त म्हणून एकत्र या, जात-पात, धर्म बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र या, कारण येणारी निवडणूक हुकूमशाही विरूद्ध लाेकशाहीची असणार असल्याचे ठाकरे म्हणाले.



