35.3 C
New York
Monday, June 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

पायरेन्स आय बी एम ए च्या पाच विद्यार्थ्यांची ईमीयन्स कोअर एल पी पी कंपनीमध्ये निवड

लोणी दि.१५ (जनता आवाज वृत्तसेवा):-पायरेन्स आय बी एम ए येथील एमबीए अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखतीमध्ये ईमीयन्स कोअर एल पी पी या कंपनीमध्ये पेरोल प्रोसेस इंटर्न आणि सेल्स इंटर्न या पदांवर निवड झाली आहे अशी माहिती आयबीएमएच्या संचालिका डॉ.अनिता खटके यांनी दिली.

या विद्यार्थ्यांमध्ये पल्लवी वारुळे, अवंतिका शेवाळे, प्रज्वल हरगुडे ,चैतन्य खांदे , आकाश घोरपडे यांचा समावेश आहे संस्थेच्या माध्यमातून विविध कंपन्यांशी करार करून प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन अभ्यासक्रमाबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात त्यामुळेच पायरेन्सच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होत आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे पाटील संस्थेचे सचिव डॉ. निलेश बनकर यांनी अभिनंदन केले आहे.

आधुनिक काळात वाढलेल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपले अस्तित्व सिद्ध करावे यासाठी पायरेन्स आयबीएम मध्ये मुलाखत मार्गदर्शन प्रशिक्षण याद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनविले जाते.वेळोवेळी होणारे चर्चासञ,परिसंवाद आणि प्रक्षेञ भेटीतून मिळालेल्या ज्ञानामुळे हे यश मिळाले आहे.

    – पल्लवी वारुळे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!