27.4 C
New York
Monday, June 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

औरंगपूरच्या उपसरपंचपदी मिनाक्षी वदक बिनविरोध 

लोणी दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा ):-शिर्डी विधानसभा मतदार संघात असलेल्या व संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या औरंगपूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत विखे पाटील समर्थक सौ. मिनाक्षी गणेश वदक यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात झाली. 

विखे पाटील गटाच्या जनसेवा मंडळाचे पंचायतीत बहुमत आहे.मंडळाचे मार्गदर्शक विजयराव डेंगळे,ज्येष्ठ कार्यकर्ते सर्जेराव आरगडे, सरपंच सौ. लक्ष्मीबाई वाकचौरे, माजी उपसरपंच इंद्रभान तांबे, मावळत्या उपसरपंच पद्माताई डोळे, सौ. अनिताताई तळोले, भास्कर तांबे, ज्ञानेश्वर तांबे, भाऊसाहेब वदक, भाऊसाहेब तळोले, लक्ष्मण चोपडे, साहेबराव तांबे, ज्ञानदेव वदक, बाळासाहेब गिरी, राजेंद्र तळोले, भरत तळोले, भाऊसाहेब डोळे, संदीप डोळे, सचिन तळोले, गणेश वदक,सुमित डेंगळे, समन्वयक दीपक सोनवणे, ग्रामसेवक श्री.मोगल यांच्यासह जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिनविरोध निवडीनंतर विजयराव डेंगळे म्हणाले की, औरंगपूर ग्रामपंचायत महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.त्यांनी ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होतो आहे. रस्ते,सभामंडप व इतरही विकास कामांसाठी भरीव निधी दिल्यामुळे कधीनव्हे असा गावाचा विकास आपल्याला बघायला मिळाला.पुढच्या काळात गावातील सर्वच कामे मार्गी लागणार असून स्वच्छ,सुंदर गाव म्हणून औरंगपूरची ओळख निर्माण होण्यासाठी सर्वांनी एकोप्याने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.नूतन उपसरपंच मिनाक्षी वदक यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील,प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, विखे कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छीन्द्र थेटे यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!