4.6 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

spot_img
spot_img

साई आदर्शला सातव्यांदा राज्य पातळीवरचा बँको ब्लु रिबन पुरस्कार

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-जिल्ह्यामध्ये आर्थिक दृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या व राहुरी फॅक्टरी येथे मुख्य शाखा असणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेला सलग सातव्यांदा राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झाला असून संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी हा पुरस्कार नुकताच स्वीकारला आहे.

याबाबत माहिती अशी की महाराष्ट्रात संस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको ब्लू रिबन पुरस्कार दिला जातो याही वर्षी या पुरस्काराचे आयोजन दमण येथे करण्यात आले होते या वर्षाच्या पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे सलग सातव्यांदा हा पुरस्कार साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेला मिळालेला आहे समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार मल्टीस्टेट पतसंस्था विभागामध्ये या पुरस्कारासाठी शंभर ते दीडशे कोटी ठेवी या गटात प्रथम क्रमांकासाठी या संस्थेची निवड करण्यात आली महाराष्ट्राचे मा. सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी स्वीकारला आहे या संस्थेने संस्थेच्या स्थापनेपासून केवळ अर्थकारणच नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला वेगळा ठसा निर्माण केल्यामुळे व इतरांना आदर्शवत काम केल्यामुळेच या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे यावेळी शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले की हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या कामाची पावती आहे संस्थेच्या प्रगती बरोबरच सभासद ठेवीदार कर्जदार यांचे हित जोपासण्याचे काम आम्ही गेली अकरा वर्षांपासून करत आहोत त्यासाठी आम्ही अहोरात्र झटून संस्था प्रगतीपथावर नेलेली आहे त्यामुळेच ठेवीदार कर्जदार सभासद यांचा विश्वास जपण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यासाठी मला संचालक मंडळ कर्मचारी कलेक्शन एजंट सभासद ठेवीदार खातेदार यांचे मोठे सहकार्य लाभलेले आहे त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास नेहमी टाकलेला आहे त्यास आम्ही कधीही तडा जाऊ दिलेला नाही येत्या कालावधीमध्ये 200 कोटींचा पल्ला आम्ही नक्कीच पार करू हा देखील विश्वास आम्हाला आहे यासाठी अनेकांनी आम्हाला शुभेच्छा दिलेले आहेत संस्थेच्या नावाप्रमाणे आदर्श काम करण्याचा नेहमी आमचा प्रयास असतो आणि तेच आम्ही करून दाखवले आहे.

हा सन्मान स्वीकारताना संस्थेचे संचालक बाळासाहेब तांबे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे संस्थेचे मॅनेजर सचिन खडके आदी सह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!