संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):–काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षणाने देशात गौरवल्या गेलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील 20 विद्यार्थी सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ एम. ए. व्यंकटेश यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर व्यंकटेश म्हणाले की गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर अत्याधुनिक सुविधा नेकचा ए प्लस दर्जा याचबरोबर विविध कंपन्यांशी नोकरीसाठी टाईप यामुळे अनेक विद्यार्थी अंतिम वर्षात असतानाच नोकरीसाठी पात्र ठरत आहे.
याचबरोबर विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी करून घेण्यात येत असल्याने अनेक माजी विद्यार्थी शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन चांगल्या पदावर कार्यरत आहेत. नुकत्याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत सिविल विभागातील वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले अजून जुनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर यासाठी ते पात्र होणार आहेत.
यामध्ये प्राजक्ता दुबे ,अविनाश देशमुख ,अविनाश चंदर ,शुभम देसले, अक्षय चौबे, सिद्धार्थ भोंडे यांची ज्युनिअर इंजिनियर या पदाकरता तर प्रशांत कानवडे, सोनल नाईकवाडी, विश्वनाथ कांबळे, सहदेव चव्हाण, रोशन शिरोळे ,गौरव राहणे, ऐश्वर्या सानप ,पियुष खैरे, प्रतीक कांबळे, भागवत सोनवणे, आशिष दराडे, दीपा डोंगरे यांची असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर अशी निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख डॉ.मधुकर वाकचौरे व शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन मिळाले विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,अकॅडमी डायरेक्टर डॉ जे. बी .गुरव,व्यवस्थापक प्रा व्ही.बी.धुमाळ, प्राचार्य डॉ एम ए.व्यंकटेश, रजिस्टर प्रा विजय वाघे यांचे सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे..