spot_img
spot_img

समनापुर मध्ये दोन गटात वाद होऊन तुफान दगडफेक, वाहनाचे मोठे प्रमाणात नुकसान यामुळे भगव्या मोर्चाला गालबोट

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):- संगमनेरच्या सकल हिंदू आक्रोश मोर्चाला अखेर गालबोट लागले. संगमनेर येथे सकल हिंदू बांधवांनी भगवा मोर्चा काढला होता. या मोर्चाला अतिशय उत्कृष्ट  असा प्रतिसाद मिळाला होता. या भगव्या मोर्चासाठी  सर्व समाजातील बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती नोंदवली होती.

आजच्या दिवशी भगव्या मोर्चा निमित्त संगमनेर शहर व ग्रामीण भाग याचबरोबर आसपास परिसरातील ६० ते ७० गावे येथील नागरिकांनी स्वतःहून गाव व दुकाने बंद ठेवून कडकडीत निषेध नोंदवला होता. संगमनेर येथे भगवा मोर्चा कार्यक्रम आटपून परत आपल्या गावी जात असताना समनापुर या गावात हिंदू व मुस्लिम या दोन गटात कोणत्या कारणाने वाद झाला हे माहीत नाही. परंतु मोर्चावरून परत येणाऱ्या बांधवांच्या चार चाकी व दुचाकी वाहनावर प्रचंड प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. दुखापत झाली आहे.

 समनापुर या गावात दोन गटात झालेला वाद हा कशामुळे झालेला आहे आद्यापी स्पष्ट झालेलं नाही. परंतु लाखोच्या संख्येने संघर्ष झालेल्या भगव्या मोर्चाला गालबोट निश्चित लागली आहे. यामुळे संगमनेर व समनापुर गावांमध्ये व शेजारील इतर गावांमध्ये नागरिकांमध्ये दहशत वातावरण आहे. समनापुरात झालेल्या दगडफेकीमुळे येथील वातावरण हे तणावग्रस्त होते. त्यामुळे तेथे तातडीने पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. समना पुरात झालेली दगडफेकी कशामुळे आहे याचा तपास पोलीस करीत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!