मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- मुंबई येथे पशुसंवर्धन मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य श्री सुदर्शन पोकळे, श्री धनंजय आहेर, श्री अनिल खामकर, श्री विलास साळवी, श्री एकनाथ मुंगसे, श्री शरद गोडांबे आणि महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स संघटनेचे श्री दिपक पाटील, श्री नंदकुमार चौधरी, श्री कमलाकर शिंदे, श्री प्रकाश लसने, श्री मनोज दासगावकर, श्री किशोर गोवारी, श्री अभिमन्यू मुंगसे, सुनिल मुंगसे, संदीप सरोदे, श्री विजय पवार, श्री अक्षय नाईकवाडी ई. प्रतीनिधी यांनी पोल्ट्रीशेड बांधकामावरील मालमत्ता कराबद्दल, वीज बील शेतीपंपाच्या दराप्रमाणे आकारण्यात यावे आणि पोल्ट्री व्यवसायासाठी अनुदानित सौरऊर्जा प्रकल्पाची तरतुद करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले.
या सर्व मुद्द्यांवर माननीय मंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करण्यात आली असून त्यांनी सबंधित विषयांवर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच मागील बैठकीत कुक्कुट खाद्य बॅगवर घटक छापण्याबाबद अंमलबजावणी होऊन ज्या कंपन्यां टाळाटाळ करत असतील त्यांची पशुसंवर्धन आयुक्तांकडून आढावा घेऊन सबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
शेवटी वरील विषया संदर्भात राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य आणि पोल्ट्री फार्मर्स संघटनेच्या प्रतिनिधीसोबत विखे पाटील साहेबांनी चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल आणि पोल्ट्री व्यावसायाबद्दल असणारी त्यांची सकारात्मकता बघून सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले.