spot_img
spot_img

श्री साई निर्माण स्कुलचा नेपाळमध्ये कराटेत डंका

शिर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची 23 मे 2023 रोजी नेपाळ येथे झालेल्या माउंट एव्हरेस्ट आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा-२०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपली चमक व छबी निर्माण केली.

त्यात कु.शर्वरी अशोक लोखंडे हिने गोल्ड मेडल व कु.विशाखा रोहिदास शेवाळे हिने सिल्वर मेडल पटकावले.या विद्यार्थ्यांना स्कुलचे कराटे प्रशिक्षक श्री सोलंकी सर व स्कुलचे क्रीडा संचालक श्री दिलीप चाफेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

या दैदिप्यमान यशाबद्दल स्कुलचे अध्यक्ष मा. श्री विजुभाऊ कोते पाटील, उपाध्यक्ष मा. श्री ताराचंद कोते पाटील, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, श्री गणेश डांगे, मुख्याध्यापक श्री संदीप डांगे, पर्यवेक्षक, श्री अरबाज पठाण व पालक यांनी कौतुक करत सत्कार केला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!