पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणासोबत विविध कौशल्ये विकसित केले तरच भविष्यात नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील असे मत प्राचार्य डॉ लक्ष्मणराव मतकर यांनी व्यक्त केले.
पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाने सेफ्टी अवेअरनेस इन केमिकल लॅबोरेटरी अँड या विषयावर आयोजित प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्यात आला होता या प्रमाणपत्र कोर्सच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून रासायनिक कंपन्यांमध्ये काम करत असताना सुरक्षितता व सुरक्षिततेबाबत कशी काळजी घ्यावी. तसेच या औद्योगिक वसाहतीत काही आपत्ती निर्माण झाल्यास या आपत्तीला कसे सामोरे जावे यासंबंधीचे विद्यार्थ्यांना माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सेवानिवृत्त हवाई दल अधिकारी व भैरवी इंडस्ट्रीज पुणे अध्यक्ष मा. दशरथ बोरुडे यांनी दैनंदिन जीवनामध्ये आपण सुरक्षितता घेतली तर विविध प्रकारचे अपघात टाळू शकतो असे प्रतिपादन केले तसेच आग आगीचे प्रकार , आग प्रतिबंधक उपकरणे, आग प्रतिबंधक उपकरणांचा वेगवेगळ्या प्रकारच्या आगीवर वापर याचे प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण देण्यात आले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल आठरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ.तुकाराम थोपटे, तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम समन्वयक प्रा. नवनाथ चेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कोर्सच्या यशस्वीतेसाठी डॉ. राहुल डिग्गीकर, डॉ संभाजी काळे, प्रा. भाऊसाहेब नरसाळे, प्रा.सागर म्हस्के , प्रा.अनिल ढोले, प्रा.सरिता कुंडलीकर, प्रा.अश्विनी ठुबे, प्रा स्वाती चौधरी, प्रा. विद्या शेळके , प्रा.राठोड व शिक्षकेतर सहकार्यांनी सहकार्य केले.




