कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- सदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने कोल्हार बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबिर पार पडले. यानिमित्ताने अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला.
काल शुक्रवारी सकाळी कोल्हार बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिराचा शुभारंभ कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्रीकांत महाराज गागरे, पंढरीनाथ खर्डे, रवींद्र लोळगे, श्रीकांत बेद्रे, केतन लोळगे, अशोक भवार, सोमनाथ येवले, सोमेश्वर घोगरे, अशोक गागरे, राजेंद्र घोटकुले, प्रदीप दंडवते, कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. टी. गायकवाड, डॉ. निलेश पारखे, प्रवरा मेडिकल ट्रस्ट रक्तपेढीचे डॉ. आदित्य बोंदर, डॉ. आयुष भुरे तसेच रक्तपेढी पथक उपस्थित होते.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दि. १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या पंधरवड्यामध्ये सदर रक्तदान शिबिर निरनिराळ्या ठिकाणी संपन्न होणार आहे. संकलित झालेल्या रक्ताच्या बाटल्या महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना देण्याचे या संप्रदायाकडून निश्चित करण्यात आले आहे.