spot_img
spot_img

संगमनेर मध्ये भगव्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद, संगमनेर कडकडीत बंद

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर शहरातील वाढती गुन्हेगारी टोळी युद्ध आणि अन्यायाच्या अत्याचाराच्या वाढत्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज संगमनेर शहरातून भगवा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात संगमनेर शहरातील हजारो नागरिकांसह आसपासच्या ग्रामीण भागातील गावकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांच्या हातात असलेले वेगवेगळे फलक हिंदू समाजाचा आक्रोश दर्शविण्यासाठी पुरेसे होते.

तर तरुणांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणांनी अवघे संगमनेर दुमदुमून गेले होते. नगरपालिके पासून निघालेला हा मोर्चा बाजारपेठ सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडी, मोमीनपुरा मार्गे प्रशासकीय भवनाजवळ पोहोचला आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात सभा होणार आहे.

अलीकडच्या काळामध्ये जोर्वे नाका रस्त्यालगत झालेल्या घटनेचे प्रकार हे बहुतांशी ठिकाणी घडत आहे. यामुळे समाजातील लोकांची मानसिकता ही बदलत चालली आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरिता सर्व समाजातील लोकांनी असा प्रकार घडू देऊ  नये  अशी उपेक्षा करायला हरकत नाही. याचबरोबर संगमनेर शहर भाग व ग्रामीण भाग येथील जनतेने व व्यापाऱ्याने कडकडीत दुकान बंद ठेवले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!