अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- सेवालाल महाराज हे सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी वंचित बंजारा समाजाच्या उध्दारासाठी कार्य केले. तसेच लहुजी वस्ताद साळवे हे थोर क्रांतीकारक होते. स्वातंञ्य लढ्याचे आद्यप्रवर्तक होते, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
अशोक कारखाना कार्यस्थळावर सेवालाल महाराज व क्रांतीकारक लहुजी साळवे यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, लहुजी वस्ताद साळवे हे थोर क्रांतीकारक होते. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्याचप्रमाणे सेवालाल महाराज यांनी वंचित असलेल्या बंजारा समाजाच्या उध्दारासाठी दिलेले योगदान देखील महनिय आहे, अशा गौरवोद्गाराने या दोघांना अभिवादन केले.
ऊसतोडणी कंत्राटदार विष्णू चव्हाण यांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्याविषयी माहिती सांगितली, ते म्हणाले की, क्रांतिसिंह सेवालाल महाराज हे भारतीय समाज सुधारक होते. शूरवीर लढवय्या ‘गोरराजवंशी बंजारा’ समाजातील प्रख्यात सद्गुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गोलाल दोडी या गावात झाला. आता ते गाव सेवालाल गड म्हणून ओळखले जाते. सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते, असे ते म्हणाले.
याप्रसंगी ऊसतोडणी कामगाराच्या वतीने अल्पोपहार व महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच गौर बंजारा समाजाच्या वतीने गायक सोमनाथ पवार यांच्या भजन संध्याचेही आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालक रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, बाबासाहेब आदिक, भाऊसाहेब उंडे, हिंमतराव धुमाळ, आदिनाथ झुराळे, सौ.मंजुश्री मुरकुटे, वाय.जी.बनकर, प्रफुल्ल दांगट, योगेश विटनोर, ज्ञानेश्वर शिंदे, विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, अमोल कोकणे, ज्ञानदेव पटारे, सौ.शितल गवारे, सौ.हिराबाई साळुंके, रामभाऊ कसार, यशवंत रणनवरे, अच्युत बडाख, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी, उपशेतकी अधिकारी प्रदीप शिंदे, शेतकी ओव्हरसिअर किरण काळभोर, संतोष सातपुते, अभिषेक लबडे, संकेत लासुरे, राजेंद्र उघडे, ऊसतोडणी कंत्राटदार अंबरसिंग चव्हाण, दिलीप राठोड, प्रवीण राठोड, भाऊसाहेब राठोड आदींसह ऊसतोडणी कामगार उपस्थित होते.