32.1 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांचा सत्कार 

कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा ):-कोपरगांव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र निवृत्ती कोळपे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यांत आला.

प्रारंभी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री. बिपीनदादा कोल्हे सत्कारप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश व राज्य पातळीवर साखर उद्योगात आधुनिकीकरणाला प्राधान्य देत सहकार चळवळीची जोपासना करण्यांसाठी पावले उचलली. तत्कालीन सहकारमंत्री म्हणून स्व. शंकरराव कोल्हे यांनी राज्यात पतसंस्थांचे जाळे विणले आणि हातावर प्रपंच असणा-या व्यक्तींची आर्थीक पत वाढविली त्यातुन अनेकांचे संसार प्रपंच सुरळीत होवुन आर्थीक प्रगती साधली. कोपरगांव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनला राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचे सातत्यांने मार्गदर्शन मिळत आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी सहकाराच्या माध्यमांतुन संस्थेबरोबरच परिसराच्या विकासावर भर द्यावा.

सत्कारास उत्तर देतांना श्री. राजेंद्र कोळपे म्हणाले की, कोपरगांव विधानसभा मतदार संघात कोल्हे कुटूंबियांनी सर्व समाजाला विविध संस्थेत प्रतिनिधीत्व देवुन सहकारात काम करण्यांची संधी दिली. कारखान्यांचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे व माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका फेडरेशन कार्याचा नांवलौकीक वाढविण्यासाठी प्रयत्न करू.

याप्रसंगी संचालक सर्वश्री. ज्ञानेश्वर परजणे, विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर होन, रमेश घोडेराव, विलासराव माळी, विलासराव वाबळे, त्रंबकराव सरोदे, संजयराव औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सर्व खाते प्रमुख उप खातेप्रमुख, विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, आजी माजी संचालक, कर्मचारी आदि उपस्थित होते.. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!