लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय डेयरी सायंस या शाख़ेत शिकणारे सन २००० चे विद्यार्थी मित्र यांचा स्नेहसंमेलन मेळावा नुकताच श्री क्षेत्र देवगड येथे पार पडला.
यानिमित्ताने एकत्र जमलेले सर्व मित्र २४ वर्षांनी एकत्र आलेत यातील बरेच लोणीतच राहतात पण एकमेकांना कमी भेटतात बाहेरगावी राहणाऱ्या मित्रांना सर्वांना भेटण्याची इच्छा नेहमीच असायची मात्र तो योग येत नव्हता व्हाट्सअप ग्रुप बनवून २ वर्षे झाली होती. सर्व मित्रांनी इच्छा व्यक्त केली की आपला गेट टू गेदर करूया मग काय सर्व मित्रांना हाक दिली सर्वांना , शक्य नव्हते तरी पण माग़िल प्रथम वर्षी पहिला मेळावा लोणी महाविद्यालयात सर्व गुरूजन यांच्या उपस्थित घेण्यात आला व हया वर्षी श्री क्षेत्र देवगड येथे सर्व मित्र भेटले ४५ माजी विद्यार्थी सहभाग नोंदवला.
कालानरुप सर्वांन मध्ये बदल दिसला त्या वेळचे मित्र लवकर ओळखू येत नव्हते प्रत्येकाने आपली ओळख करून दिली आणि आपला व्यवसाय व नोकरीच्या स्वरूप सांगितले कौटुंबिक स्थिती सगितली मुले काय करतात सहचरणी काय काम करते वैगेरे वैगेरे.
हे सर्व घडत असताना जिवाभावाच्या मित्रा बरोबर काहींनी आपले सुख आणि दुःख व्यक्त करून मनमोकळे केले जणू काही त्यांनी मनातील ओझे मोकळे केले असे म्हणता येईल.
ह्या वेळी सर्वांनी एक निर्धार केला आणि ठरवले की दर वर्षी तरी एकदा भेटायचे आणि जीवनातील तो आनंद परत मिळवायचा. या बॅचचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीयर, व्यावसायिक, शेतकरी ,उद्यजोक , सैनिक , कृषि क्षेत्र ,नौकरी अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.