28.5 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपुरात सोमवारी जाहीर हिंदू धर्मसभा राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाजातर्फे आयोजन

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाज श्रीरामपूर यांच्यावतीने सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भगतसिंग चौक मेन रोड श्रीरामपूर या ठिकाणी जाहीर हिंदुधर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या हिंदू धर्म सभेत नगर येथील मंगल भक्त सेवा मंडळाचे संस्थापक श्री विश्वेश्वर स्वामी उर्फ राजाभाऊ कोठारी तसेच शिवचरित्रकार नवनाथ महाराज म्हस्के हे मार्गदर्शन करणार आहेत तर पुणे येथील स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती शरद मोहोळ, हभप राहुल महाराज पोकळे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक सागर बेग हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय श्रीराम संघाच्यावतीने या सभेदरम्यान अन्याय मुस्लिम वक्फ बोर्ड बरखास्त झाला पाहिजे, लव जिहाद व धर्मांतर बंदी कायदा झाला पाहिजे, प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कायदा झाला पाहिजे तर स्वातंत्र्यवीर सावरकर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळाला पाहिजे अशा मागण्या करण्यात येत आहेत. या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्या निमित्त राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाज श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर हिंदू धर्मसभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती – राष्ट्रीय श्रीराम संघ सागर बेग

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!