23.9 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

न्यू इंग्लिश स्कुल चितळी येथे १२ वीच्या परीक्षा केंद्रास मान्यता

चितळी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चितळी (ता.राहाता) येथे २०२४ वर्षांपासून इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र मंजूर झाले असून याच केंद्रावर (दि.२१) फेब्रुवारी पासून इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती चितळी महाविद्यालयाचे प्राचार्य धोत्रे ए.एल. यांनी दिली.

न्यू इंग्लिश स्कुल चितळी सह स्वामी विवेकानंद कॉलेज वाकडी, रुरल हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज पुणतांबा, लिटल एंजल्स स्कुल व ज्युनिअर कॉलेज पुणतांबा, न्यू इंग्लिश स्कुल व श्री.वि.ल.धनवटे पाटील कनिष्ठ महाविद्यालय पुणतांबा सह आदी कनिष्ठ महाविद्यालये सदर परीक्षा केंद्रास संलग्नित करण्यात आले आहेत.परीक्षा केंद्रावरून इयत्ता बारावीच्या परीक्षेत २६७ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

यासाठी केंद्रसंचालक म्हणून प्रा.उत्तम कुताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर मागील अनेक वर्षांपासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांंना परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते;परंतु चितळी महाविद्यालयात नव्याने सुरू झालेले परीक्षा केंद्र विद्यार्थी व पालकांना अत्यंत सोईचे ठरणार आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!