36.9 C
New York
Thursday, June 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

तेलंगणा(हैदराबाद)येथे अभ्यासगट भेटीसाठी प्रज्वल नवले व विराज हापसे यांची निवड.

टाकळीभान( जनता आवाज वृत्तसेवा ): —समग्र शिक्षा अंतर्गत राष्र्टीय अविष्कार अभियान सन २०२३/२४ या उपक्रमाअंतर्गत राज्याबाहेर अभ्यासगट भेटीचे आयोजन करण्यात आले असून श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यु इंग्लीश स्कुल विद्यालयाचे प्रज्वल नवले व विराज हापसे यांची तेलंगणा(हैदराबाद)येथे अभ्यासगट सहलीसाठी निवड करण्यात आली आहे.

जि.प. अहमदनगर शिक्षण विभाग प्राथमीक यांचेकडून आदेशीत करण्यात आल्यानूसार ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत झाल्या आहेत व ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती सर्वोत्तम आहे. त्यांना प्रोत्साहन व बक्षिस देण्यासाठी इतर राज्यात भेटी देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. इतर राज्यातील शाळा व इतर ठिकाणी आपल्या राज्यातील मुलांनी भेटी दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचाराची देवाणघेवाण तसेच सांस्कृतीक वृध्दीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वाढ होईल. त्या अनूषंगाने या अभ्यासगट सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये उच्च प्राथमीक(इयत्ता ८ वी) शिष्यवर्ती परिक्षा २०२३ मधील शासकीय/जि.प.शाळा/स्थानिक स्वराज्य संस्था/शासकीय अनूदानीत शाळेतील गुणवत्ता यादीत सर्वात जास्त गुण असणारे प्रथम १२ मुले व प्रथम १३ मुली असे एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

टाकळीभान येथील न्यु इंग्लीश स्कुल या विद्यालयाचे प्रज्वल बापूसाहेब नवले व विराज ऋषीराज हापसे या दोन विद्यार्थ्यांची या अभ्यासगट भेट सहलीसाठी निवड झाली आहे. प्राचार्य बी.टी.इंगळे यांच्या अथक प्रयत्नामुळे न्यु इंग्लीश स्कुल टाकळीभान या शाळेचा शैक्षणीक स्तर उंचावला आहे. जिल्ह्यातील प्रगत शाळेमध्ये या शाळेचा समावेश झाला असून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती सर्वोत्तम आहे. याचाच परिपाक शिष्यवृत्ती परिक्षेत या शाळेचे विद्यार्थी चमकले आहे. परिणामी त्यांची निवड ही तेलगंणा(हैदराबाद)येथे अभ्यासगट सहलीसाठी करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे प्राचार्य बी.टी.इंगळे, पर्यवेक्षक ए.डी.बनसोडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समस्त टाकळीभान ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!