गुणवत्ता पुर्ण शिक्षण देत असतांनाच प्रवरेच्या माध्यमातून नोकरी मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी महाविद्यालयांचा आणि संस्थेच्या माध्यमातून प्रक्षेञ भेटी,विविध ठिकाणी कंपन्यामधील नवनवीन तंञज्ञान,कार्यशाळेच्या माध्यमातून व्यक्तीमहत्व विकास विविध कंपन्या करार आणि माजी विद्यार्थ्याचे योगदान यामुळे नोकरी देण्यात प्रवरा अव्वल स्थानावर आहे असे डाॅ.खैरे यांनी सांगितले.
प्रवरेच्या संगणक महाविद्यालयातील बी. सी. ए. विद्यार्थिनींची टीसीएस कंपतीत निवड
लोणी दि.५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय लोणी येथील टी. वाय. बीसीए मध्ये शिकत असलेल्या कु. वैष्णवी मापारी आणि कु. आकांक्षा भवर यांची महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंटच्या विभागामार्फत टीसीएस या नामांकित कंपनीत नुकतीच निवड झाली आहे. अशी माहीती प्राचार्या डाॅ.अनुश्री खैरे यांनी दिली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पा., सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,शिक्षण अधिकारी प्रा.नंदकुमार दळे, प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे, उपप्राचार्या प्रा. राजश्री तांबे, विभाग प्रमुख प्रा. संजय वाणी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केलेले आहे.



