35.8 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

मराठा आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उद्या (मंगळवार, दि. २०) विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ओबीसी आणि इतर समाजघटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!