spot_img
spot_img

लोणी बुद्रुक आणि खुर्द येथे ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज लोणी बुद्रुक आणि खुर्द येथे ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव समितीने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात महसूल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले.

यावेळी छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याचे पूजन ना विखे पाटील यांच्या हस्ते करून महाआरती करण्यात आली व महाराजांना विनम्र अभिवादन केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पथकाने महाराजांना सलामी देत महाराजांबद्दल असलेल्या निष्ठेचे दर्शन घडविले.

याप्रसंगी जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील,ध्रुव विखे पाटील व ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!