29.6 C
New York
Tuesday, August 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

आमदार लहू कानडे यांच्या यशोधन कार्यालयात शिवजयंती साजरी

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – आमदार लहू कानडे यांच्या याशोधन संपर्क कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना अशोक कानडे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा संपूर्ण जगात आदर्श घेतला जातो. याचे कारण आचार, विचार व चारित्र्य या विचाराच्या सूत्रावर महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. परंतु दुर्दैवाने आज महाराष्ट्रात या विचारला तिलांजली दिली जात आहे. वेगळ्या पद्धतीचे राजकारण समाजापुढे उभे राहत आहे. समाजकारण, राजकारण करायचे असेल तर छत्रपती शिवरायांनी दिशादर्शक मार्ग दाखविला, त्यांचा आचार,विचार व चारित्र्याचा विचार घेऊन पुढे गेले पाहिजे, तसेच समाजातील अपप्रवृत्तीला तीव्र विरोध केला पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने शिवरायांचे विचार जिवंत ठेवू शकू.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक मुक्तार शहा, सेवादलाचे सरवरअली सय्यद, रिपाइंचे संतोष मोकळ, विजय कोळसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करून माजी आमदार स्व. ससाणे यांच्या स्मृतीस उजाळा दिला.

यावेळी सतीश बोर्डे, सरपंच अशोक भोसले, रमेश आव्हाड, राजेंद्र कोकणे, नानासाहेब रेवाळे, प्रताप देवरे, दीपक कदम, दीपक निंबाळकर, अजिंक्य उंडे, राधाकृष्ण तांबे, प्रा. शहाजी कोकणे, रमेश उंडे, अक्षय नाईक, सुनील शिंदे, आशिष शिंदे, कल्पेश माने, प्रतीक कांबळे, आकाश शेंडे, बाळासाहेब दरेकर, महेश खंडागळे, नंदू खंडागळे, संदीप खंडागळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. रज्जाक पठाण यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!