spot_img
spot_img

सबका साथ सबका विकास या धोरणामुळे नऊ वर्षात देशात सर्वसमावेशक विकास – सौ.शालीनीताई विखे पाटील

आश्वी दि.५(जनता आवाज वृत्तसेवा):-देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीने देश जागतिक पातळीवर पोहचला असून मागील नऊ वर्षात सबका साथ सबका विकास यातून सर्वानाच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले असून देशाची आणि राज्याची वाटचाल ही विकासामुख होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
    

संगमनेर तालुक्यातील पिपरीलौकी- अंजमपूर येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेसह ६ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाच्या भुमीपूजन प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अँड रोहीणीताई निघुते, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. डी. कदम, प्रवरा बँकेचे संचालक भाऊपाटील गायकवाड, अजय ब्राम्हणे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब ज-हाड, पिपरी लोकाईच्या सरपंच संगिता गिते, उससरपंच अशोक गिते, भाऊसाहेब लावरे,प्रा.कान्हु गिते, भारत गिते, सिताराम दातीर,भाऊसाहेब मुंढे, कार्यकारी अभियंता गढदे, जलसंधारण विभागाचे कपिल बिडगर, सुरेश’ मकालिक, अमोल घोडके, राजेंद्र कासार, ग्रामसेविका सौ. काळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या नरेंद्रजी मोदीचे काम सर्वसमावेशक राहीले आहे. जागतिक पातळीवर भारत देश सक्षमपणे पुढे जात आहे. कोविड लसीकरण, दळणवळण सुविधा, विविध योजनेतून थेट जनतेला निधी, उद्योग, रोजगार आदी कामातून देश प्रगती करत आहे. वयोश्री योजनेच्या माध्यमातून वयोवृद्ध नागरीकांना मदत करणारे नरेंद्रजी मोदी एकमेव पंतप्रधान ठरले आहेत असे सांगून शिर्डी मतदार संघात महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून जनतेच्या मनातील अपेक्षित कामे होत आहे. संगमनेरची गांवे शिर्डी मतदार संघात आल्याने विकासाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. राज्यांत शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे योजनांना गती मिळत असून शासन आपल्यादारी, लंम्पी लसीकरण, एक अर्ज अनेक दाखल, ६०० रूपयांमध्ये एक ब्रास वाळू या निर्णयामुळे हे सरकार जनतेचे वाटत आहे. असे सांगून विकासाचा हा रथ पुढे ही सुरू राहील आपला गावचा एकोपा कायम ठेवा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत गिते यांनी तर आभार अशोक गिते यांनी मानले.

{गावात होणारी विकास कामे ही आपल्यासाठी आहेत. ती चांगली करून घ्या मतभेद करणारे आणि गावाच्या विकासात खोडा घालणारे आहेत. त्यांना थारा देऊ नका. विखे पाटील हे पारदर्शक कारभार करतात विकासाकामामध्ये डुप्लीकेटपणा करू नका असा इशारा सौ.विखे पाटील यांनी यावेळी दिला.}
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!