लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन व त्याचे विचार जपा इतिहास समजून घेत. त्यांच्या विचाराचा जागर कायम सोबत ठेऊन मार्गक्रम करा असा संदेश विद्यार्थ्यांना देत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या उपस्थित प्रवरा शैक्षणिक संकुळात छञपती शिवाजी महाराजांची जयंती सामाजिक उपक्रम राबत साजरी करण्यात आली.
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा,कनिष्ठ आणि उच्च महाविद्यालय अतांत्रिक शाखाच्या माध्यमातून छात्रपती शिवाजी महाराजाच्या ३९४ व्या जयंती निमित्त प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनीताई विखे पाटील यांच्या उपस्थित जयंती सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, तंत्रनिकेतचे प्राचार्य डॉ. व्ही. आर राठी, आय टी आय चे प्राचार्य धंनजय आहेर आदी उपस्थित होते.
पद्यश्री विखे पाटील महाविद्यालय, लोणी येथे देखिल शिवचरित्रावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवरा औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात संचालक बी एम. पाटील, प्राचार्य डॉ. संजय भवर, डॉ रविद्र जाधव यांच्या उपस्थितीत अभिवादन, मर्दानी खेळ आणि परिसर स्वच्छाता करणात आली.
संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिवजयंती निमित्त कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविशेष शिवचरित्र या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले तर कृषी महाविद्यालयाने लेझीम पथकाने सादरीकरण करण्यात आले, तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाने गड किल्याचे सादरीकरण करण्यात आले.यावेळी कृषी संचालिका शुभांगी साळोखे, प्राचार्य.डॉ.अनिल बेंद्रे, डॉ.विशाल केदारी उपस्थित होते.
लोणी बुद्रुक येथे झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात संस्थेच्या विखे पाटील महाविद्यालल, प्रवरा कन्या विद्या मंदीर,प्रवरा गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय,पद्यश्री विखे पाटील सैनिक स्कुलच्या एन.सी.सी आणि संस्थेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने शानदार संचलन करत मानवंदना देण्यात आली.