लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अभिषेक दारकुंडे, हर्षद टकले यांची रूरल रिजिनल बँकेमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली.
आय.बि. पि.एस प्रादेशिक ग्रामीण बँकां मार्फत घेण्यात आलेल्या विशेष अधिकारी स्केल-२ मध्ये कृषी अधिकारी यापदासाठी घेण्यात आल्या परिक्षेमध्ये अभिषेक दारकुंडे यांची बडोदा गुजरात ग्रामीण बँकमध्ये तसेच हर्षद टकले यांची दक्षिण बिहार ग्रामिण बँकेमध्ये कृषी अधिकारी पदी निवड झाली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी प्रथम वर्षा पासूनच महाविद्यालयात विविध ट्रेनिंग, बँकिंग, महाराष्ट्र नागरीक सेवा परीक्षांबद्दल पूर्व तयारी करुन घेण्यात येते.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी, तसेच संस्थेचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी मनोज परजने, महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी भाऊसाहेब घोरपडे आणि इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.