नेवासा फाटा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- नुकताच डॉ. हेगडेवार प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर(ATS) झाला आहे . .21जानेवारी 2024 रोजी विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्र महाविद्यालय अहमदनगर आयोजित अहमदनगर टॅलेण्ट सर्च (ATS ) परीक्षा घेण्यात आली होती . ही परीक्षा दरवर्षी इयत्ता फक्त चौथी व इयत्ता सातवी या दोनच वर्गासाठी घेतली जाते . कारण इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शासकीय शिष्यवृती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी हा या परीक्षेचा मुख्य हेतू आहे . या परीक्षेचा जि . प . प्राथमिक शाळा सौंदाळा या शाळेचा निकाल 100 % लागला असून सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत .तर तर अकरा विद्यार्थ्याना 300 पैकी 200 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत .
जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
1 ) समर्थ ढेरे – ( 282 गुण ) जिल्ह्यात तिसरा
2 ) आरुषी गायकवाड – (264 गुण ) जिल्ह्यात दहावी
3 ) आयुष नवाळे – (262 गुण ) जिल्ह्यात अकरावा
4) आर्यवीर निंबाळकर – (262 गुण ) जिल्ह्यात – अकरावा
5) अभिनव नवले -( 252 गुण ) जिल्ह्यात सोळावा
6) श्रृती दाभाडे – (242 गुण ) जिल्ह्यात एकविसावी
इतर गुणवंत विद्यार्थी – आराध्या आरगडे ( 234 गुण ), शिवम कंठाळी ( 224 गुण ) ओम गवळी (222 गुण ) , स्वरांजली गिलबिले ( 216 गुण ) , गार्गी लांडे (200 गुण )श्लोक डहाळे ( 198 गुण )
सर्व यशस्वी विद्यार्थ्याना वर्ग शिक्षक कल्याण नेहूल सर सहकारी शिक्षक राजेश पठारे सर, रवींद्र पागीरे सर,कल्पना निघुट मॅडम , संजिवनी मुरकुटे मॅडम , किशोर विलायते सर तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक पंढरीनाथ घुले सर यांचे मार्गदर्शन मिळाले . सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे नेवासा तालुक्याचे मा.गटशिणाधिकारी शिवाजी कराड साहेब , मा. सुरेश पाटेकर साहेब , विस्तार अधिकारी मा . धिंदळे साहेब , केंद्रप्रमुख मा . सुभान शेख साहेब , पावल गोर्डे सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य सौंदाळा गावाचे लोकसेवक सरपंच ,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य , विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व सदस्य सौंदाळा ग्रामस्थ व पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे .