लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-मुलींना मोठी करिअर संधी उपलब्ध आहे.आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जा.जीवनात मोठं व्हा आदर्श कामातून आपली ओळख निर्माण करा असा संदेश देतांना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याना परिक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील शुभेच्छा दिल्या.
प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज लोणी विद्यालयाचा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थीनीच्या निरोप समारंभात सौ.विखे पाटील बोलत होत्या यावेळी संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे,प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी आदीसह शिक्षक उपस्थित होते.
शालेय जीवनाबद्दल बोलताना इयत्ता दहावीची कु. ध्रुवा बेंद्रे आणि सिद्धी घोगरे यांनी त्यांना शाळे कडून मिळालेले संस्कार आणि विविध उपक्रमांत सहभाग घेण्यात शिक्षकांकडून मिळालेले प्रोत्साहन अत्यंत भाऊक शब्दात वर्णन केले.इ.१०वी च्या विद्यार्थिनींनी शालेय जीवन , आपले शिक्षक आणि वस्तीगृह जीवनावर आधारित कविता करून त्यांचे मनोगत मांडले. बारावीच्या शब्दाली वाबळे आणि पल्लवी खंडागळे या विद्यार्थिनींनी त्यांच्या जडणघडणीमध्ये शाळेचा मोठा वाटा आहे.या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थिनींना शाळेकडून शाळेची आठवण म्हणून त्यांच्या वर्गाच्या विद्यार्थिनीं मैत्रिणींची फोटो फ्रेम भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थिनींनी शाळेला २५ खुर्च्यांची भेट प्रदान केली. इयत्ता बारावीची किरण जनवर या विद्यार्थिनीने सौ.विखे पाटील यांचे स्वहस्ते बनवलेले स्केच भेट स्वरूपात दिली.