श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – स्वराज्य संस्थापक छ.शिवराय हे देशाचे आराध्यदैवत आहेत. त्यांनी अठरापगड जाती आणि सर्वधर्मिय लोकांचे संघटन करुन स्वराज्याची स्थापना केली. रयतेला गुलामगिरीतून मुक्त करुन निर्भय व स्वाभिमानी बनविले. त्यांची आज्ञापञे ही ग्रामविकास, शेती व जलसंवर्धन आदिंचे वस्तुपाठच आहेत, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने शहरात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी छ.शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस श्री.मुरकुटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बोलताना श्री.मुरकुटे म्हणाले की, स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक होते. त्यांनी सामान्य माणसातील आत्मविश्वास जागवून आत्मसन्मानाने जगणे शिकविले. शिवरायांचं जीवन अत्यंत प्रेरणादायी असून युवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेवून देश उभारणीसाठी कार्यरत झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन अॅड.सुभाष चौधरी, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, अॅड.पृथ्वीराज चव्हाण, अॅड.उमेश लटमाळे, रोहन डावखर, भास्करराव खंडागळे, प्रमोद करंडे, अमोल कोलते, संकेत संचेती, अनिल कुलकर्णी, वैभव सुरडकर, ज्ञानदेव वर्पे, शाम सोनावणे, राम सोनावणे, कैलास भागवत, रोहित मालकर, लालाशेठ देवी, अनिल गिरमे, स्वप्नील मुरकुटे, दत्तात्रय सलालकर, सुदेश झगडे, प्रशांत लहामगे, पप्पू मोरगे, सोहम मुळे, पंकज देवकर, बाळासाहेब मोरगे आदी उपस्थित होते.