8.6 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी मधील १९९३-९४ सालच्या बॅचचा स्नेहमेळावा संपन्न… तब्बल ३० वर्षांच्या काळानंतर विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न..

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-भैरवनाथ विद्यालयात तब्बल ३० वर्षांनंतर विद्यालयाचे १९९३-९४ सालच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हाॅटेल कुणाल सुपा ह्या ठिकाणी दि.१७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.विद्यालय सुरू झाल्यानंतर ची सुरुवातीची बॅच होती, १९९३-९४ साली ह्या सर्व विद्यार्थ्यांची दहावी झाली आणि पुढील शिक्षणासाठी सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने पुढे गेले. मुलींची लग्न झाली तर काही जण नोकरी व्यवसाय निमित्ताने पुणे मुंबई या ठिकाणी गेले. धावपळीच्या आणि धगधगीच्या युगामध्ये वेळात वेळ काढून सर्वजन एकत्र येण्यासाठी तयार झाले.

जवळ जवळ शाळा सोडल्यानंतर सर्वच जण तर तब्बल ३० वर्षांनी काल झालेल्या स्नेहमेळाव्या पहिल्यांदा भेटले असतील. बरेच दिवसांनी भेटलेल्या मित्र मैत्रीणीना एकमेकांना भेटल्यावर खूपच प्रसन्न आणि आनंददायी वाटले आणि सगळेजन कसे बालपणीच्या आठवणी मध्ये भारावून गेले. गप्पांच्या मैफली मध्ये सर्वजण रमले आणि परत आता शाळेमध्येच आहोत अशी प्रत्येकाची भावना झाली. सुंदर अशा या शाळेतील गप्पा गोष्टींमध्ये सर्व बाल मित्र परत विद्यार्थी दशेत गेले. सकाळ पासून जमलेल्या मित्र परिवाराला एकत्र आल्या नंतर दिवस कसा गेला हे समजले नाही, शेवटी निरोप देताना एकमेकांना जड अंतःकरणाने सर्वांनी निरोप दिला तो परत एकत्र येण्याची अटी वर!!!!

४५ विद्यार्थीचा पट असलेली ही बॅच ३० मुले आणि १५ मुली अशी होती. सोशल मीडियाच्या व्हॉटसअप ग्रुप द्वारे सर्वांना एकत्र जोडण्याचं काम गेले तीन वर्ष सुरू होत, जसजसे फोन नंबर मिळत गेले तसतसे ग्रुप मध्ये समाविष्ट करून संपर्कात ठेवण्यात आले. सर्वांच्या सोयीनुसार स्नेहमेळाव्याची तारीख ठरली ती म्हणजे १७ फेब्रुवारी.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आठ दिवसामध्ये करण्यात आले आणि हे नियोजन करण्यामध्ये विशेष पुढाकार घेतला विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी सविता शेळके आणि शालन रेपाळे तसेच तात्याभाऊ रेपाळे व रामदास पोटे यांनी अगदी सूत्रबद्ध नियोजन केलं . यामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं त्यामुळे कार्यक्रमाला शोभा वाढली. स्नेहमेळाव्याची सुरुवात शिक्षकवृंद यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली, तसेच कार्यक्रमाची सुत्रसंचालन विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांनी अनुसया रेपाळे हिने केले व स्नेहमेळाव्याच अध्यक्षस्थान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.अशोक गवळी सर यांनी भूषवले. अध्यक्ष स्थान निवडीच्या प्रस्तावाला शालन रेपाळे या विद्याथिनींनी अनुमोदन दिले.

दरम्यान झालेल्या भाषणामध्ये गुरुवर्य श्री.गवळी सरांनी अतिशय अनमोल असे मार्गदर्शन केल तसेच शिक्षकांमध्ये आमचे वर्ग शिक्षक श्री. साहेबराव चौधरी सर यांनी माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीना उजाळा करुन दिली. श्री आवारी सर, गोसावी सर यांनीही माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नंतर माजी विद्यार्थी अनुसया रेपाळे, मंगल बोरुडे, ठकुबाई पोटे, कुंदा रेपाळे, दादाभाऊ रेपाळे, तात्याभाऊ रेपाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बाकी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. सौ. मिरा पुजारी मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना फिटनेस साठी योगासने आणि प्राणायाम करावेत याचे मोलाचे मार्गदर्शन केले व सर्वाचे आभार मानले. यावेळी माजी विद्यार्थ्यां कुंदा रेपाळे, अनुसया रेपाळे, शालन रेपाळे, मंगल रेपाळे, मंगल बोरुडे, सविता शेळके, सविता मंडले, ठकुबाई पोटे, शोभा चेडे, रत्नमाला पुजारी, माधुरी पुजारी, विजया दुस्मान, मिना गाडेकर, तात्या भाऊ रेपाळे, रामदास पोटे, भाऊसाहेब रेपाळे, गंगाराम रेपाळे, दादाभाऊ रेपाळे, राजेंद्र रेपाळे, लहानु रेपाळे, विष्णु रेपाळे, संतोष बोरुडे, संजय बोरुडे, रंगनाथ बोरुडे, हिरामण चेडे, आबा दुस्मान, नानाभाऊ मगर आणि राजेंद्र पोटे हे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात हजर होते.

 

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!